• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

डोंबिवलीतील मराठी तरुण करतोय मायबोलीचा विस्तार… अगदी सातासमुद्रापार!

Admin by Admin
September 14, 2024
in Positive news
2
डोंबिवलीतील मराठी तरुण करतोय मायबोलीचा विस्तार… अगदी सातासमुद्रापार!

 

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे, आपल्या मुंबईतून…

 

‘भाषा’ हे आपले विचार शब्दातून व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम..जगभरातून हजारो भाषा बोलल्या जातात आणि महाराष्ट्राची मातृभाषा म्हणजे आपली लाडकी मराठी. प्रदेशानुसार तिची रूपे आणि लय बदलतच असते, परंतु तिची मुळातली गोडी मात्र तशीच अबाधित राहते. डोंबिवली येथे राहणारे कौशिक लेले २०१२ पासून जगभरातील अनेकांना मोफत शिकवत आहेत. त्यांनी आपल्या मायबोलीचा सातासमुद्रापार विस्तार करण्याचे जणू व्रतच घेतले आहे.

जर्मनी, कोस्टारिका, युके, जपान, अमेरिका, चीन, ब्रिटन अशा अनेक देशातील नागरिकांचा आणि अधिकतर तरुणाईचा समावेश आहे. मराठी भाषा शिकण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्यांना कौशिक मोफत मराठी आणि गुजराती भाषेचे प्रशिक्षण देतात. हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करून त्यांना मराठीचे प्रशिक्षण देण्यात येते.

विशेष म्हणजे स्वतःची नोकरी सांभाळून कौशिक यांनी हे अतिशय स्तुत्य काम हाती घेतले आहे. कौशिक प्रशिक्षण देत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेकांचा समावेश आहे. काही जण मराठी भाषेतून पी. एच. डी करत आहेत. काही जणांचा साथीदार मराठी भाषिक आहे. तर काही जणांचे मित्र मैत्रिणी मराठी आहेत. कारणे अनेक असली तरीही मराठी भाषा आत्मसात करण्याची ओढ आणि उत्सुकता मात्र दांडगी आहे. इंग्रजांकडून मिळालेली इंग्रजी भाषा जशी आपल्या अंगवळणी पडली तशीच आता आपली मराठी भाषा सुद्धा जगभरातील अनेकांना मुखोद्गत करण्याचे काम कौशिक करत आहेत.

आधी ब्लॉग्स मार्फत आणि मग वाढता प्रतिसाद बघता वेबसाइट आणि मग यू ट्यूबच्या माध्यमातून कौशिक जगाच्या कानाकोपऱ्यात मराठीचा प्रसार करत आहेत. मराठी सोबतच त्यांना हिन्दी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, चिनी अशा अनेक भाषा त्यांना येतात. या माध्यमातून जगभरात अनेकांना आपल्या मराठी भाषेचा गोडवा अनुभवता येतोय आणि ती शिकता येते आहे ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.

Previous Post

असाही एक भारतीय जिगरबाज! १०१ व्या वर्षी जिंकली तीन सुवर्णपदके…

Next Post

नाकाला जीभ लावून आजोबांनी केला विश्वविक्रम!

Admin

Admin

Next Post
नाकाला जीभ लावून आजोबांनी केला विश्वविक्रम!

नाकाला जीभ लावून आजोबांनी केला विश्वविक्रम!

Comments 2

  1. डॉ. पूजा पराग सामंत says:
    1 year ago

    मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी कौशिक लेले करत असलेले प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कामासाठी खूप सार्‍या शुभेच्छा आणि कौशिक लेले यांच्या विषयी आम्हाला अधिक माहिती दिल्याबद्दल स्वदेश न्यूज आणि पराग पोतदार यांचे आभार.
    धन्यवाद.

    Reply
  2. Ramesh Chavan says:
    1 year ago

    अभिनंदन सर

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.