• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

५० फूट लांब कॅनव्हासवर साकारले महाराष्टाचे पर्यटन वैभव

Admin by Admin
September 10, 2024
in my news pune
0
५० फूट लांब कॅनव्हासवर साकारले महाराष्टाचे पर्यटन वैभव

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-

 

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…

 

तब्बल ५० फूट लांब आणि ३ फूट रुंद अशा कॅनव्हासवर २५ महिला चित्रकारांनी महाष्ट्रातील विविध पर्यटनस्थळे रंगवून पुणे फेस्टिव्हलमध्ये अनोखा उपक्रम साजरा केला. लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे संपन्न झालेल्या या उपक्रमात देशातील उत्साही महिला चित्रकार सहभागी झाल्या होत्या.

सर्व महिलांना एकत्रितपणे आपली कलाकृती सादर करता यावी म्हणून एक मोठे चित्र साकारण्याचा संकल्प करण्यात आला. पुणे फेस्टिवल कमिटीने त्याला पूर्ण पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे व महाराष्ट्राची संस्कृती या विषयावर आधारित “वैभव महाराष्ट्राचा हे भव्य चित्र साकारण्यात आले.

 


या कॅनव्हासवर कोकण किनारपट्टी, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, १२ ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातले गड – किल्ले, वनसंपदा, महाराष्ट्रातील काही प्रमुख मंदिरे, अटल सेतू इत्यादी पर्यटनस्थळे महिला चित्रकारांनी साकारली. कॅनव्हासवर अॅक्रेलिक कलर, वॉटर कलर्स, खडू, पेन्सिल, कोळसा इत्यादी माध्यमातून पेंटिंग्ज रंगवली गेली. ५० फुट लांबीच्या या अनोख्या पेंटीगचे उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाच्या संचलनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे प्रमुख किरण ठाकूर व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विश्वस्त डॉक्टर प्रणिता टिळक उपस्थित होते.

यावेळी इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड कंपनी तर्फे ‘पुणे फेस्टिवल” आणि “आकृती ग्रुप” यांच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट व मेडल प्रदान करण्याबाबत घोषणा करण्यात आली. हे कॅनव्हास पेंटिंग दि. १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत प्रेक्षकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

पर्यटननगरी बनलेल्या पुणे शहरात अधिकाधिक देशी-परदेशी पर्यटक पुण्यात यावेत व पुण्याचे ब्रॅडींग जगभर व्हावे यासाठी, पुणे फेस्टिव्हलतर्फे महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या सहयोगातून अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. त्यातीलच हा उपक्रम आहे. असे याच्या समन्वयक आकृती ग्रुपच्या अॅड. अनुराधा भारती यांनी यावेळी सांगितले.

३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि., भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डीनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिवर्सिटी, बढेकर ग्रुप, अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्युट हे उपप्रायोजक आहेत.

Previous Post

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा मुलगा ठरला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी!

Next Post

इथे ज्वालामुखीच्या काठावर आहे 700 वर्षे जुनी गणेश मूर्ती

Admin

Admin

Next Post
इथे ज्वालामुखीच्या काठावर आहे 700 वर्षे जुनी गणेश मूर्ती

इथे ज्वालामुखीच्या काठावर आहे 700 वर्षे जुनी गणेश मूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.