स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची गोड बातमी आहे पुण्यातून…
बाप्पाचा आवडता पदार्थ कोणता? तर आपण मोदक असं चटकन म्हणून जातो. उकडीचे मोदक तर अनेकांच्या आवडीचा विषय.
आज आपण अशा फॅक्टरी ची माहिती जाणून घेणार आहोत ज्या ठिकाणी दिवसाला तब्बल पन्नास हजार मोदक बनवले जातात. ही पुण्यातील सर्वात मोठी मोदक फॅक्टरी ठरली आहे.
गेली 17 वर्षे पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये मेढी मोदक फॅक्टरी असून गेल्या अनेक वर्षापासून अनेक महिला या ठिकाणी काम करतात. पुण्यातील मेढी कुटुंब या ठिकाणी मोदक बनवण्याचा व्यवसाय करतात. हातवळणीच्या मोदकांना येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अतिशय चविष्ट व त्यावरून केसर लावलेल्या मोदकांना या ठिकाणी पुण्यातील अनेक मिठाईच्या दुकानांना गणेशोत्सव काळात कोथरूडच्या मेढी मोदक कारखान्यातून पुरवठा होतो.
गणपती उत्सवात दिवसाला सुमारे एक लाख मोदक या कारखान्यात बनविले जातात. विशेष म्हणजे या ठिकाणी फक्त गणेशोत्सवातच नाही तर 365 दिवस मोदक मिळतील. सुमारे 40 महिला या ठिकाणी मोदक बनवत असून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाते. येथे हातवळणीचे मोदक बनवले जातात. दिसायला अतिशय मस्त, सुरेख आणि पाहता क्षणी आपण त्या मोदकांच्या प्रेमात पडू असा त्यांचा आकार असतो. तसेच देशभरात मोठे सेलिब्रेटी आहे ते देखील या मोदकांचे फॅन आहेत.
याविषयी अक्षय मेढी म्हणतात, माझ्या आई-वडिलांनी 30 ते 50 मोदकांपासून सुरुवात केली होती आता आम्ही 35 ते 40 हजारांच्या आसपास मोदक बनवतो. इथे जवळपास 40 ते 50 बायकांना आम्ही काम दिलंय. त्यांना महिना – दोन महिने ट्रेनिंग दिले जाते. त्यात कशाप्रकारे मोदक वळले गेले पाहिजेत, कशाप्रकारे ते सुबक दिसले पाहिजे त्याविषयी ट्रेनिंग त्यांना दिले जाते. एक मोदक 15 सेकंदामध्ये वळला गेला पाहिजे अशा प्रकारचे ट्रेनिंग त्यांना दिले जाते. मोदक नक्षी करण्याचे जे काम आहे त्याला ‘हँडमेड टच’ आपण देतो मशीनरी वापरत नाही. हा मोदक 35 रुपये पर पीस असून झोमॅटो ॲप किंवा स्विगी वर ऑनलाइन सुद्धा विकायला सुरुवात केली आहे.