• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

आपल्या गणेशोत्सवाची आता ‘ग्लोबल’ भरारी

Admin by Admin
September 6, 2024
in my news pune
0
आपल्या गणेशोत्सवाची आता ‘ग्लोबल’ भरारी
  • आगळ्यावेगळ्या  ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन
  • जर्मन तरुणीच्या मर्दानी खेळाने सगळे मंत्रमुग्ध

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून

पुण्याने उचलून धरलेली कल्पना ग्लोबल रूप घेते असेही म्हणतात ते उगाच नव्हे. त्या पार्श्वभूमीवर  ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे’ उदघाटन पुण्यातील शिवाजीनगर येथील प्राईड हॉटेल येथे करण्यात आले. पहिल्यांदाच होत असलेल्या या फेस्टिव्हलचे उदघाटन परदेशी तरुणांनी केले. यावेळी जर्मनीच्या एका तरुणीने मर्दानी खेळ सादर करत पुणेकरांचे मन जिंकले. गणेशोत्सवला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल उपयुक्त ठरेल अशी भावना यावेळी गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


यावेळी ‘मोरया हेल्पलाईन’ची घोषणा करण्यात आली. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी ही हेल्पलाईन सहकार्य करेल. तसेच यावेळी ‘ग्लोबल गणेश समिटही’ झाले.

या समिटमध्ये ग्लोबल गणेशोत्सवाने कशाप्रकारे पुण्याचे अर्थकारण व धार्मिक पर्यटन बदलेल, सोलो ट्रॅव्हलचा गणेशोत्सवाला होणारा फायदा, ग्लोबल गणेश पर्यटन, मोरया हेल्पलाईन, रोटरी क्लबचा ग्लोबल गणेश फेस्टिवलला होणारा फायदा, गणेशोत्सव जागतिक होण्यासाठी शिक्षणसंस्थांची भूमिका काय असेल, भारतीय आयोजकांनी काय करावे, शासनाची धोरणे व उपक्रम काय असावेत, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी आफ्रिकन विद्यार्थी त्रिश व त्रोबा, जर्मन विद्यार्थिनी लोताया, डॉ. रघुनाथ कुचिक, डॉ. सतीश देसाई, रामनाथ सोनवणे, संयोजक वैभव वाघ, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, उदय जगताप, ऍड. अनिष पाडेकर, विनीत परदेशी, पियुष शहा, नितीन पंडित, धनश्री वाघ-पाटील, अनिरुद्ध येवले, योगेश आलेकरी आदी उपस्थित होते.

यावेळी वैभव वाघ म्हणाले, “जगातील अनेक महोत्सवांपेक्षा गणेशोत्सव हा अधिक व्यापक व भव्यदिव्य स्वरूपाचा आहे. परंतु, या उत्सवाला म्हणावी तशी जागतिक स्तरावर ओळख मिळाली नाही. या उत्सवाचा पर्यटन केंद्र म्हणूनही मोठा विकास होऊ शकतो. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, त्यातून रोजगारनिर्मिती उभारण्यासाठी आणि आपला पारंपरिक व ऐतिहासिक गणेशोत्सव जगभर जाण्यासाठी ‘ग्लोबल गणेश फेस्टिवल’ आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीपासून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहचणे हेच मुख्य धेय आहे. जागतिक गणेश मंडळे व पुण्यातील गणेश मंडळांचा सामंजस्य करार घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे. यानिमित्ताने जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.”

डॉ. सतीश देसाई म्हणाले की, गणेशोत्सव जगाच्या नकाशावर जाण्यासाठी स्थानिक व परदेशी आयोजकांनी एकमेकांशी समन्वय साधायला हवा.

वैभवचे काम उल्लेखनीय असून, सातत्याने नाविन्यपूर्ण कल्पना राबवतो. ग्लोबल गणेशमुळे पुण्याचा गणेशोत्सव जगभर जाईल, असे भारत देसडला यांनी नमूद केले.

महेश सुर्यवंशी यांनी धार्मिक पर्यटन विकसित करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. गणेशोत्सव ग्लोबल आहेच, त्याची ओळख आणखी व्यापक करायला हवी, असे ते म्हणाले.

योगेश आलेकरी म्हणाले, जगभर फिरत असताना मला अनेक सण साजरे करता आले. भारतातही परदेशी पर्यटक येतात; त्यांच्यासाठी पूरक गोष्टींची उपलब्धता करून द्यायला हवी.

सूत्रसंचालन चिद्विलास क्षीरसागर यांनी केले. अमित जाधव यांनी आभार मानले.

Previous Post

इतिहासात प्रथमच भारताने तिरंदाजीत जिंकलं ‘सुवर्ण’

Next Post

पुण्यातील ‘श्रीमंत’ दगडूशेठ थेट काश्मीरात विराजमान

Admin

Admin

Next Post
पुण्यातील ‘श्रीमंत’ दगडूशेठ थेट काश्मीरात विराजमान

पुण्यातील 'श्रीमंत' दगडूशेठ थेट काश्मीरात विराजमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.