- ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर’ स्पर्धेची उपविजेती
- ११७ देशांतील ६० हजार छायाचित्रकारांमधून निवड
- 10 वर्षांखालील गटात पटकाविला दुसरा नंबर
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे दिल्लीहून…
दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये राहणाऱ्या एका 9 वर्षाच्या छोट्या कन्येने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. श्रेयोवी मेहता असे या कन्येचे नाव असून ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ या स्पर्धेत ती उपविजेता ठरली आहे.
10 वर्षांखालील गटात तिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत 117 देशांतील हजारो फोटोग्राफर्सनी भाग घेतला होता. अंदाजे 60 हजार छायाचित्रांमधून श्रेयोवी हिने काढलेला फोटोला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून निवडण्यात आले.
दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी लंडनममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात तिला उपविजेता म्हणून सन्मानित केले जाणार आहे. श्रेयोवी ही वडिलांसोबत नॅशनल पार्कला फिरायला गेली होती. इथे काढलेला फोटो पाहून सगळेच थक्क झाले. राष्ट्रीय इतिहास संग्रहालय (NHM) तर्फे दरवर्षी लंडनमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. जगभरातील अनेक मोठे छायाचित्रकार यात सहभागी होतात. पण इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या श्रेयोवीने सर्वांना मागे टाकत भारतीयांची मान उंचावलीय.
श्रेयोवी तिच्या आई-वडिलांसोबत राजस्थानमधील भरतपूर इथे केवलदेव नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी गेली असताना उद्यानात मॉर्निंग वॉक करताना तिला दोन मोरांची जोडी दिसली. श्रेयोवी तिच्या वडिलांकडे धावत गेली आणि त्यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेतला. त्यानंतर हे दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ती जमिनीवर झोपली आणि कॅमेरा जमिनीजवळ ठेवून दोन्ही मोरांचा सुंदर फोटो तिने क्लिक केला.
श्रेयोवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. श्रेयोवीला फोटोग्राफीच वेड लहानपणापासून आहे. तिला हे बालकडू तिच्या वडिलांकडून मिळाले आहे. तेही फोटोग्राफर आहेत. आता तिने वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर होण्यासाठी वाघाचे अप्रतिम फोटो काढण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
All Indians are proud of you and your photography. Congratulations