• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

समर्पित सेवेचा यथोचित गौरव, ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा सन्मान

Admin by Admin
August 31, 2024
in Positive news
0
समर्पित सेवेचा यथोचित गौरव, ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…

बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज ऑर्गनायझेशन तर्फे ७५ वर्षे झालेल्या ४० निवृत्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या सदस्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते सदस्यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी प्रा अनिरुद्ध देशपांडे  म्हणाले, “बदलत्या आर्थिक व सामाजिक परिस्थिती मध्ये निवृत्त बँक अधिकारी,कर्मचारी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विविध सामाजिक प्रकल्पात पुढाकार घेत आहे ही प्रेरणादायी गोष्ट आहे.बँकिंग क्षेत्र हे समाज परिवर्तनाचे मोठे केंद्र झाले आहे. जागतिक स्तरावर आपल्या देशाची आर्थिक वाटचाल तिसऱ्या क्रमांकावर होत असतांना आर्थिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत.निवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी स्वतःला सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्वतःला विविध सामाजिक प्रकल्पामध्ये गुंतवून घेण्याचे” आवाहनही या प्रसंगी उपस्थितांना केले.
बँक ऑफ महाराष्ट्रचे लोकमंगल येथील सरव्यवस्थापक के राजेशकुमार यांनी महाराष्ट्र बँकेच्या प्रगतीमध्ये निवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संघटनेचे राष्ट्रीय महासचिव नारायण अचलेरकर यांनी संघटनेच्या कार्याचा अहवाल सादर केला.गेल्या २५ वर्षापासून निवृत्त महाबँक सदस्यांचे प्रश्न सोडवण्या बरोबरच सामाजिक जाणिवेतून १८१ संस्थांना दोन कोटी २५ लाख इतक्या रकमेची आर्थिक मदत केल्याचे सांगितले.येत्या २१-२२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संघटनेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाची माहिती यावेळी सर्वांना दिली. यावेळी “निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या उत्साहाचे स्वागत करून सर्वांनी एकत्रितपणे सामाजिक कार्य करीत असल्याबद्दल संघटनेची प्रशंसा केली.
या कार्यक्रमास बाळासाहेब फडणवीस,मोहन घोळवे,संतोष गदादे,के.राजेशकुमार,नारायण अचलेरकर,भास्कर माणकेश्वर,मधुसूदन निमकर उपस्थित होते. याप्रसंगी बापूसाहेब वाघमारे, अनिल तिकोटीकर,सुभाष रावळ,हिंदी साहित्यिक डॉ दामोदर खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वीणा इतराज ह्यांनी केले. मुकुंद भस्मे यांनी आभार मानले.

Previous Post

कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर ‘प्रवीण मसालेवाले ट्रस्ट’ची कौतुकाची थाप!

Next Post

शेकडो मुस्लिम बांधवांचा अवयवदानासाठी विधायक पुढाकार

Admin

Admin

Next Post
शेकडो मुस्लिम बांधवांचा अवयवदानासाठी विधायक पुढाकार

शेकडो मुस्लिम बांधवांचा अवयवदानासाठी विधायक पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.