• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

दहावीला नापास, तरी जीवनाच्या परीक्षेत सुपरसक्सेस!

Admin by Admin
August 29, 2024
in Success Story
1
दहावीला नापास, तरी जीवनाच्या परीक्षेत सुपरसक्सेस!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook
  • मेहनतीच्या जोरावर पटकावले तीन राष्ट्रीय पुरस्कार
  • १२०० लोकांना देत आहेत रोजगार

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

 

आजची चांगली बातमी आहे बालानगरहून

 

अनेकदा आपण छोट्या घटनांनी, अपयशाने निराश होऊन जातो. पण एखादा असतो जो त्या अपयशाच्या छाताडावर पाय रोवून यशाला खेचून आणतात. आजची यशाची कहाणी ही अशीच. दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतरसुद्धा जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन त्यांनी ३५० कोटींची उलाढाल करणारी स्वतःची कंपनी उभी केली आहे.

राकेश चोपदार हे त्या यशस्वी उद्योजकाचे नाव. राकेश चोपदार हे दहावीच्या परीक्षेत नापास झाले आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांकडून अनेकदा अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागल्या; मात्र ते खचले नाहीत. दहावीनंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कारखान्यात, ‘ॲटलस फास्टनर्स’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी इंजिनियरिंग आणि उत्पादनातील कौशल्ये वाढवली. अनेक अडचणी असूनही त्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग करून स्वत:ला विकसित केले. जवळपास १२ वर्षे वडिलांच्या कारखान्यात काम केल्यानंतर राकेश यांनी २००८ मध्ये आझाद इंजिनियरिंग या स्वतःच्या नव्या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी बालानगरमध्ये २०० स्क्वेअर मीटरच्या शेडमध्ये सेकंड-हॅण्ड सीएनसी मशीनसह सुरुवात केली आणि युरोपियन कंपनीसाठी थर्मल पॉवर टर्बाइन एअरफोइल बनवण्यासाठीची हजारो डॉलर्सची ऑर्डर त्यांना मिळाली. थर्मल पॉवरने सुरुवात करत नंतर आण्विक, वायू आणि हायड्रोजन टर्बाइनचे उत्पादन बनविण्यास सुरुवात केली.

एक भारतीय कंपनी इतके चांगले 3D फिरणारे पार्ट्स बनवू शकते यावर जागतिक स्तरावर विश्वास ठेवला गेला नाही पण राकेश यांच्या आझाद इंजिनियरिंगने स्पर्धात्मक किमतीत जागतिक दर्जाची उत्पादने देऊन आपली क्षमता सिद्ध केली. सध्या ते भारतातील एकमेव असे उद्योजक आहेत, जे या श्रेणीमध्ये काम करतात. सध्या राकेश यांची आझाद इंजिनियरिंग उद्योगातील एक प्रमुख प्लेअर म्हणून उभी आहे, जी पॉवर सेक्टर, लष्करी विमाने आणि तेल व वायू उद्योगांमध्ये ही कंपनी जागतिक स्पर्धा करते  तसेच रोल्स-रॉइस, बोईंग, सफारान, जीई, मित्सुबिशी, सीमेन्स, बेकर ह्यूजेस, प्रॅट अॅण्ड व्हिटनी, डूसन, हनीवेल व तोशिबा यांसारख्या प्रख्यात मूळ उपकरण निर्मात्यांसोबत (OEMs) धोरणात्मक भागीदारी स्थापन केली आहे.

राकेशच्या कंपनीने २००८ मधील दोन कोटींवरून २०२३-२०२४ मध्ये ३५० कोटींची कमाई केली आहे. ही कंपनी आता सुमारे १,२०० लोकांना रोजगार देत असून आझाद इंजिनियरिंग टुनिकी बोलाराम व जिन्नाराम येथे २,००,००० चौरस मीटरमध्ये पसरलेल्या ८०० कोटींच्या गुंतवणुकीसह आपला व्यवसाय वाढवीत आहे. एक विश्वासार्ह व दर्जेदार निर्माता म्हणून आपली प्रतिष्ठा निर्माण करून, आझाद इंजिनियरिंगने २०२२ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले.

Previous Post

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुण्यातील शिक्षणसंस्था घेणार पुढाकार

Next Post

युद्धात पाय गमावलेला युक्रेनचा सैनिक बनलाय ‘रियल हिरो’

Admin

Admin

Next Post
युद्धात पाय गमावलेला युक्रेनचा सैनिक बनलाय ‘रियल हिरो’

युद्धात पाय गमावलेला युक्रेनचा सैनिक बनलाय 'रियल हिरो'

Comments 1

  1. Sushil says:
    2 years ago

    He is inspiration

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.