स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे मुंबईतून…
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एनआयआरएस रँकिंग जाहीर केली असून त्यात पहिल्या ५० राज्य विद्यापीठात महाराष्ट्रातील चार विद्यापीठे आहेत. त्यात पुणे विद्यापीठाने तिसरा क्रमांक पटकावला असून मराठवाड्यातील एक, पश्चिम महाराष्ट्रातील दोन आणि मुंबईतील एका विद्यापीठाचा या क्रमवारीत समावेश आहे.
देशातील केंद्रीय विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, कॉलेज, संशोधन संस्था, आयआयटी, एनआयटी, राज्य विद्यापीठे, कायद्याचे शिक्षण देणाऱ्या संस्था, कृषी क्षेत्रातील शैक्षणिक संस्था अशा अनेकांची क्रमवारी जाहीर केली. ही क्रमवारी त्या संस्थेतील शिक्षणाचा दर्जा दर्शविते. यामध्ये राज्य विद्यापीठांची क्रमवारीही जाहीर केली आहे. देशातील राज्य विद्यापीठांच्या क्रमावारीत तामिळनाडू राज्यातील अण्णा विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवला तर पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठ दुसऱ्या स्थानी राहिले. या यादीत तिसरे स्थान महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकाविले. तर पहिल्या ५० विद्यापीठांत राज्यातील चार विद्यापीठे आहेत. त्यात
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
२०२४ च्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे तिसऱ्या स्थानी राहिले. पुणे विद्यापीठाला एकूण ७०.२६ गुण मिळाले. महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट राज्य विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. इथल्या दर्जेदार शिक्षणामुळे या विद्यापीठाने NIRF Ranking मध्ये आघाडी घेतली आहे.
मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै १८५७ रोजी झाली. यंदाच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये या विद्यापीठाने ५८.७५ गुण मिळवत १८ वा क्रमांक मिळवला. महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट राज्य विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ दुसऱ्या स्थानावर आहे.
सीओईपी टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी पुणे
एनआयआरएफ रँकिंगमध्ये सीओईपी टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी पुणे या विद्यापीठाला ५३.३७ गुण मिळाले आहेत. भारतातील सर्वोकृष्ट विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ ३३ व्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट राज्य विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
एनआयआरएफ रँकिंग2024 मध्ये देशातील सर्वोकृष्ट विद्यापीठांच्या यादीत या विद्यापीठाने ४६ वा क्रमांक मिळवला आहे. या विद्यापीठाला ४९.५४ गुण प्राप्त झाले आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट राज्य विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ चौथ्या स्थानावर आहे.