• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

आत्मयोगगुरू डाॅ. संप्रसाद विनोद यांचा ‘योग चिकित्सा रत्न’ पुरस्काराने सन्मान

Admin by Admin
August 24, 2024
in Positive news
0
आत्मयोगगुरू डाॅ. संप्रसाद विनोद यांचा ‘योग चिकित्सा रत्न’ पुरस्काराने सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook
  • इंडियन योग असोसिएशनच्या वतीने विशेष गौरव

 

पुणे : योगप्रसाराच्या माध्यमातून मानवतेसाठी अविरतपणे केलेल्या बहुमोल योगदानाची दखल घेऊन इंडियन योग असोसिएशनच्या वतीने आत्मयोगगुरु डाॅ. संप्रसाद विनोद यांना ‘योग चिकित्सा रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

इंडियन योग असोसिएशन ही राष्ट्रीय पातळीवर योगप्रसाराचे काम करणारी एक महत्त्वाची संस्था असून त्यांच्या माध्यमातून योगप्रसारासाठी काम करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा दरवर्षी गौरव केला जातो. महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून अभिजात योगसाधना आणि योगोपचार या दोन्हीच्या माध्यमातून गेली ५० वर्षे आत्मयोगगुरु डाॅ. संप्रसाद विनोद अखंडपणे जे कार्य करीत आहेत त्या कार्यासाठी हा विशेष पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्ष डाॅ. हंसाजी योगेंद्र व सरचिटणीस सुबोध तिवारी यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. योगगुरु स्वामी रामदेव बाबा आणि अध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर हे देखील योग इंडियन असोसिएशनचे सदस्य आहेत.

आत्मयोगगुरु डाॅ. संप्रसाद विनोद हे गेल्या ५० वर्षांपासून योगप्रसाराचे कार्य आंतरिक तळमळीने करीत आहेत. आजवर देश-विदेशातील हजारो साधकांना त्यांनी अभिजात योगसाधना शिकवली असून उत्तम जीवन जगण्याची जीवनदृष्टी त्यांनी प्रदान केलेली आहे. आत्मयोगगुरु डाॅ. संप्रसाद विनोद यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी अभिजात योगसाधना लोकांना सोपेपणाने समजावी यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखनही इंग्रजी व मराठी भाषेतून केलेले आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या वयाचा अमृतमहोत्सव आणि योगप्रसाराचा सुवर्णमहोत्सव साजरा केली.

Previous Post

संघ स्वयंसेवकांनी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्ग केला चकाचक!

Next Post

५० पैशांची कॉफी ते १०० कोटींचे साम्राज्य!

Admin

Admin

Next Post
५० पैशांची कॉफी ते १०० कोटींचे साम्राज्य!

५० पैशांची कॉफी ते १०० कोटींचे साम्राज्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.