• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

उत्कृष्ट अभिनयाला सातासमुद्रापार मिळाली दाद!

Admin by Admin
August 21, 2024
in Positive news
2
उत्कृष्ट अभिनयाला सातासमुद्रापार मिळाली दाद!
  • दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव 
  • ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) तर्फे सन्मान 

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची चांगली बातमी आहे थेट अमेरिकेतून…

 

एखाद्या कलाकाराचं मोठेपण हेच असतं की त्याची कला सीमांची बंधने पार करून सातासमुद्रापार जाते आणि तिथेही चांगल्या कामाची दखल घेतली जाते. ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) च्या वतीने ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा अमेरिकेत जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. अर्थातच प्रत्येक मराठी माणसासाठी ही आनंदाची बातमी आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना नाफा आणि अभिजीत घोलप यांच्याकडून ‘जीवन गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

दिलीप प्रभावळकर हे चिमणराव गुंड्याभाऊ, चौकट राजा, अलबत्या गलबत्या मधील चेटकीण, फास्टर फेणेमधील भा. रा., देऊळ मधील मास्तर, बोक्या सातबंडेचे प्रणेते आणि नाटकं गाजवणारे नाट्याकलाकार  म्हणून ओळखले जातात.

‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ च्या वतीने अमेरिकेत फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलेला आहे.  अमेरिकेच्या भूमीत मराठी चित्रपट रूजवण्याचे स्वप्न चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी बघितले होते आणि ते त्यांनी सत्यात उतरवूनही दाखवले. अमेरिकेत सातासमुद्रापार मराठी चित्रपटांना एक अनोखं स्थान देत घोलप यांनी मराठी चित्रपटसृष्टीची पताका रोवली आहे. दिमाखात सुरू असलेल्या या चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने दिग्गज कलाकारांची मांदियाळीच अमेरिकेत अवतरली आहे.

‘नाफा’च्या या चित्रपट महोत्सवला दिग्गजांनी हजेरी लावली. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात हा चित्रपट महोत्सव पार पडला. तसेच सुप्रिया व सचिन पिळगांवकर यांनी सिनेरसिकांशी संवाद साधला. दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी मास्टरक्लास घेतले. यासोबतच निवेदिता सराफ, अश्विनी भावे, महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, प्रसाद ओक, मेधा मांजरेकर आदी दिग्गज कलाकार या महोत्सवाला उपस्थित राहिले. या सर्व दिग्गज कलाकारांनी आपले कलेतील योगदान अमेरिकेतील भारतीयांसमोर मांडले.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ या चित्रपटाचे निर्माते आणि उद्योजक अभिजीत घोलप यांना अमेरिकेतील भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठी सिनेरसिकांसाठी अमेरिकेच्या मातीत मराठी सिनेमा आणि सिनेमासंस्कृती रूजवायची होती. याची सुरूवात त्यांनी काही मराठी चित्रपटांची निर्मिती थेट अमेरिकेत करत केली. अमेरिकेतीलच निर्मितीमूल्ये असलेले ‘पायरव’ आणि ‘निर्माल्य’ या दोन शॉर्टफिल्म्स या महोत्सवात पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आल्या.

‘कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये रंगलेला हा महोत्सव मराठी कलाप्रेमींना एक वेगळा दृष्टिकोन देऊन गेला. तसेच मराठी मातीपासून आपण दूर नाही, तर अमेरिकेतही आपली नाळ मराठी सिनेजगताशी बांधली गेली आहे, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट महोत्सव होता‌ आणि त्याला सिनेरसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

Previous Post

ती हारली तरीही ती जिंकली! … गुडघे न टेकता ती एका हाताने लढली…

Next Post

हरवलेलं घर मिळवून देणारा देवदूत!

Admin

Admin

Next Post
हरवलेलं घर मिळवून देणारा देवदूत!

हरवलेलं घर मिळवून देणारा देवदूत!

Comments 2

  1. Ashutosh Kale says:
    2 years ago

    Congratulatiins..realy needed such chanel for creating positivity.

    Reply
  2. Sushil says:
    2 years ago

    Great actor..

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.