• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

माध्यम क्षेत्रातील चांगल्या कामाला पुरस्काराचे कोंदण!

Admin by Admin
August 17, 2024
in Positive news
0
माध्यम क्षेत्रातील चांगल्या कामाला पुरस्काराचे कोंदण!

देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांची घोषणा

सम्राट फडणीस, प्रसाद पानसे, सूरज खटावकर -प्रशांत दांडेकर, रसिका कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…

माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४ची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाईम्सचे पुण्यातील बातमीदार प्रसाद पानसे, मराठी किडा या सोशल मीडिया पेजचे निर्माते सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर, कोल्हापूर येथील टोमॅटो एफ.एम.च्या कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद व नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते.

या पुरस्कारांचे वितरण गुरूवार दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते होणार आहे. ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसार माध्यमे’ या विषयावर यावेळी सुनील आंबेकर यांचे व्याख्यान होणार आहे.

या वेळी अभय कुलकर्णी म्हणाले, पुरस्कार उपक्रमाचे हे १३ वे वर्ष असून आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या नावे हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील चार माध्यमकर्मींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना २१ हजार रुपये रोख व देवर्षी नारद मूर्ती तर अन्य तीन पुरस्कार ११ हजार रुपये रोख व देवर्षी नारद मूर्ती असे आहे . भारतीय परंपरेतील आद्य पत्रकार म्हणून देवर्षी नारद यांना ओळखले जाते. दरवर्षी त्यांच्या नावाने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

या पूर्वी हे पुरस्कार ’ए बी पी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, ’झी २४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ’तरुण भारत’ बेळगावचे संपादक किरण ठाकूर, ’दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ’महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ’लोकसत्ता’ पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर ’आज का आनंद’चे संपादक श्याम अग्रवाल, वरिष्ठ पत्रकार पराग पोतदार, ज्येष्ठ पत्रकार अमित परांजपे, अभिजित अत्रे, नाशिकच्या देशदूतच्या संपादक वैशाली बालाजीवाले आदिंना देण्यात आले आहेत.

 

Previous Post

किराणादुकान ते ५०० कोटींची उलाढाल!

Next Post

स्वतःला ओळखा, संकल्प करा, सर्वोत्तम बना!

Admin

Admin

Next Post
स्वतःला ओळखा, संकल्प करा, सर्वोत्तम बना!

स्वतःला ओळखा, संकल्प करा, सर्वोत्तम बना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.