• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

रिक्षाचालकाचा मुलगा बनला देशातील सर्वात तरुण आयएएस

Admin by Admin
August 17, 2024
in Success Story
0
रिक्षाचालकाचा मुलगा बनला देशातील सर्वात तरुण आयएएस
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची चांगली बातमी आहे, आपल्या मराठवाड्यातून…

यूपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. यूपीएससीमध्ये यश मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. पण, अनेक प्रयत्न करूनही बहुतेक जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत किंवा या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. काही जण अगदी कमी वयातच त्यांची स्वप्न पूर्ण करतात. अशीच गोष्ट आहे अन्सार शेख या आयएएस अधिकाऱ्याची. IAS अन्सार शेख २०१६ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी यूपीएससी सीएसई (CSE) परीक्षा उत्तीर्ण करणारा देशाला सर्वांत तरुण आयएएस अधिकारी ठरला आहे.

अन्सार शेखचे वडील मराठवाडा, महाराष्ट्र येथे ऑटोरिक्षाचालक म्हणून काम करायचे. पण, त्यांना दारूचे व्यसन होते. त्याची आई पूर्वी शेतात काम करायची. आर्थिक अडचणींमुळे त्याच्या धाकट्या भावाने इयत्ता सातवीमध्ये शाळा सोडली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोटार गॅरेजमध्ये काम केले. काम करता करता धाकट्या भावाने यूपीएससीच्या तयारीत अन्सार शेखचीही मदत केली, त्यामुळे अन्सार शेख याचे बालपण आणि त्याचा यूपीएससीचा प्रवास कोणत्याही कष्टापेक्षा कमी नव्हता. अन्सार शेख याच्या कुटुंबात शिक्षणाला कधीच प्राधान्य दिले गेले नाही. तो घरगुती हिंसाचार, बालविवाह जवळून पाहत मोठा झाला होता आणि अखेर तो यूपीएससी सीएसई (CSE) परीक्षा उत्तीर्ण करणारा देशाला सर्वांत तरुण आयएएस अधिकारी ठरला.

या यशानंतर अन्सार म्हणतो, गरिबीचा यशाशी काहीही संबंध नाही. बरेच लोक गरीब असल्याचं कारण पुढे करतात. पण, गरिबीचा यशाशी काहीही संबंध नसतो हे लक्षात ठेवा. फक्त तुमच्यात मेहनत करण्याची तयारी हवी.  ध्येय आणि दृढनिश्चय असला पाहिजे.

अन्सार शेख याच्या यशात त्याच्या कुटुंबाचा, मित्रांचा मोठा वाटा आहे. अन्सार शेख याचा भाऊ, मित्रांच्या मानसिक, आर्थिक पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते, असे अन्सार नम्रपणे नमूद करतो.

तुमची स्पर्धा स्वतःशीच 
ज्यांना वाटते की आपण इतर हजारो इच्छुकांशी स्पर्धा करत आहोत. मुळात हा विचारच चुकीचा आहे.  आपली स्पर्धा ही स्वतःशीच असते. एकदा का परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना हे समजले की त्यांना यश मिळेल एवढं नक्की…

 

Next Post

शिव नाडर करतात दररोज पाच कोटींचे दान!

Admin

Admin

Next Post
शिव नाडर करतात दररोज पाच कोटींचे दान!

शिव नाडर करतात दररोज पाच कोटींचे दान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.